वंध्यत्व चिकित्सा
डॉ. मिलिंद पिशवीकर
भारतामध्ये वंध्यत्वाची समस्या जवळ जवळ १५% जोडप्यांना भेडसावते. वंध्यत्व चिकित्सा, त्याबद्दलची तपासणी व उपचारांमध्ये आता खूप प्रगती झाली आहे.
ही समस्या वाढीला लागली आहे काय? होय
स्त्री / पुरुषांना होणारे STD हे आजार व सध्याची धकाधकीची जीवनपद्धती असू शकेल.
लग्नानंतर कुठल्याही प्रकारचे गर्भनिरोधक साधन एक वर्ष न वापरता व नियमित संबंध ठेवूनसुद्धा दिवस न राहिल्यास सल्ला घ्यावा. गर्भधारणा होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात.
१. Ovulation - म्हणजे स्त्रीच्या अंडाशयातून स्त्रीबीज तयार होऊन ते सुटणे. ही क्रिया ज्या स्त्रीमध्ये नियमित पाळी असते तिच्यामध्ये महिन्यातून एकदा सर्वसाधारण पाळीच्या १४/१५ व्या दिवशी घडते.
२. Fertilization (फलित बीज) सुटलेले स्त्रीबीज गर्भाशयाच्या नळ्यातून गर्भाशयात येते. हे होत असताना पुरुष बीज (शुक्रजंतू) योनीमार्गातून वर सरकत नळीमध्ये येतात व त्यांचे मीलन होऊन गर्भ तयार होतो. स्त्री बीज एकदा सुटल्यावर ते १२-१४ तासच गर्भधारणेस योग्य राहते. पुरुष बीज मात्र २ दिवसापर्यंत जगू शकतात.
३. Implantation (गर्भधारणा) गर्भाचे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रोपण होणे. यासाठी गर्भाशयाच्या पिशवीचे अस्तर चांगले तयार व्हावे लागते या तीन महत्त्वाच्या क्रियांमध्ये कुठेही अडथळा आल्यास वंध्यत्वाची तक्रार येते.
कारण पुरुषांमध्ये, स्त्रीमध्ये किंवा दोघांच्यात मिळून असू शकते.
स्त्री वंध्यत्व
एका स्त्रीमध्ये दर महिन्याला ३-४ अंडबीजे तयार होऊ लागतात. त्यातील एक अंडबीज परिपक्व होते. हे अंडबीज अंडकोषातून बाहेर पडते ते गर्भाशयाच्या पिशवीच्या नळीत येते. तिथे त्याचे पुरुष बीजाशी (शुक्रजंतुशी) मीलन होते. हा तयार झालेला गर्भ पुढे सरकून गर्भाशयात येतो व तेथे त्याचे रोपण होते. अर्थातच यातल्या कोणत्याही क्रियेमध्ये अडचण आल्यास स्त्रीला दिवस राहत नाहीत.
स्त्री वंध्यत्वाची कारणे :-
१. अंडाशयातून अंडबीज तयार न होणे, वा तयार होऊन न सुटणे. (PCOD)
२. नळ्या (Tubes) बंद असणे.
३. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दोष असणे. उदा पिशवी खूप लहान आकाराची असणे. पिशवीमध्ये पडदा असणे.
४. पिशवीचे अस्तर व्यवस्थित तयार न होणे. (हार्मोन्सची कमतरता अगर इन्फेक्शनमुळे)
५. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये व नळ्याभोवती पडदे तयार होणे ही गोष्ट पूर्वीच्या
अ) Infection मुळे असू शकते.
ब) Operation मुळे असू शकते.
क) Endometriosis मुळे (पिशवीचे अस्तर पिशवीच्या बाहेर पसरणे) यामुळेही असू शकते.
६ स्त्रीमध्ये पिशवीच्या मुखाजवळ वा योनीमार्गात काही वेळेला पुरुषबीजनाशक स्त्राव वा Antibodies तयार झाल्यास पुरुष बीज वरती सरकू शकत नाही.
७. स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्समध्ये काही दोष असल्यास व
८. स्त्रीमध्ये गुणसूत्राचा दोष असल्यास.
स्त्री वंध्यत्व चिकित्सा व उपचार :-
Tests for Ovulation म्हणजे अंडाशयातून अंडबीज तयार होतात का नाही हे बघण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाचण्या, उदा.
१. पाळी नियमित होणे.
२. पाळीच्या मध्यावर म्हणजे १२-१४ व्या दिवशी पोटात दुखणे.
३. पाळीच्या मध्यावर योनी मार्गातील स्त्राव वाढणे.
४. स्त्रीने स्वतःचे म्हणजे BBT बेझल बॉडी टेंपरेचर ठेवणे.
BBT म्हणजे काय ?
सकाळी गादीतून उठण्यापूर्वी (चूळ वगैरे भरण्याच्या आत) तोंडातील टेंपरेचर घेणे व रेकॉर्ड ठेवणे. पाळीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टेंपरेचर रेकॉर्ड ठेवल्यास अंडबीज तयार होऊन फुटल्यानंतर त्या स्त्रीमध्ये Temp. 1/2° ने जास्त राहील.
म्हणजे उदा.
समजा १२ व्या दिवशी ९८ अंश असेल तर १४ व्या दिवशी ९८.५ अंश असे दिसेल.
आता ही गोष्ट डॉक्टरांना कशी कळू शकते ?
१. Urine-LH तपासणी करून.
पाळीच्या मध्यावर रुग्णांची लघवी तपासली जाते. त्यामध्ये स्त्रीबीज सुटण्यासाठी निर्माण होणारे खाव आढळल्यास स्त्रीबीज तयार होऊन सुटल्याचे समजू शकते.
२. Blood Progrestrone स्त्री बीज सुटल्यानंतर रक्तातील Progestorne हे स्राव वाढतात.
३. EB इंडोमेट्रीयल बॉयापसी पिशवीच्या अस्तराचा तुकडा काढून तपासल्यास
४. स्कॅन करून पाळीच्या १०-११ दिवसापासून एक आड एक दिवस TVS म्हणजे योनीमार्गातून स्कॅन करून अंडाशयातून होणारे बिल व ते फुटते का? याकडे लक्ष देता येते.
इतर तपासण्या :
a) HSG (हिस्टोसालपिगोंग्राफी) :- म्हणजे पिशवीचा फोटो काढणे (औषध सोडून) यामध्ये नळ्या व गर्भाशयाच्या पिशवीची माहिती मिळू शकेल.
b) लॅप्रोस्कॉपी व हिस्ट्रोस्कोपी :
c) हार्मोन्स AMH, FSH, LH, E2, Prolaction इत्यादी.
पुरुष वंध्यत्व
पुरुष वंध्यत्वाची कारणे :-
१. शुक्रजंतू कमी असणे / अजिबात नसणे.
२. शुक्रजंतूची चपळता कमी असणे आणि
३. वीर्यपात न होणे ही प्रमुख कारणे असतात.
या प्रकारच्या समस्या कुणामध्ये येऊ शकतात.
१. ज्यांना STD हे आजार झाले आहेत.
२. गालगुंड (पुरुष वयात आल्यावर) झाले असल्यास.
३. पुरुषजननेंद्रियाजवळ व त्यासंबंधी काही शस्त्रक्रिया झाली असल्यास.
४. Varicocele :- म्हणजे पुरुष जननेंद्रियाजवळच अशुद्ध रक्तवाहिन्यांचे जाळे वाढते. त्यामुळे जनेंद्रिया (TESTES) व तापमान वाढून शुक्रजंतुची उत्पत्ती कमी होणे किंवा चपळता कमी होते.
५. कांही औषधे, उदाहरणास्तव मानसिक आजारासंबंधी वा ब्लड प्रेशर संबंधीची औषधे व्यक्ती घेत असल्यास.
६. Testes :- ची खूप उष्णतेशी संबंध आल्यास उदा. फरनेसच्या ठिकाणी काम करणे वगैरे.
७. तंबाखूचे सेवन केल्यास.
८. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास इतर
९. गुणसूत्रातील व आंतरस्त्रावातील दोषांमुळे
१०. मोबाईलचा अति वापर.
त्याबद्दलची तपासणी :-
अ) पुरुषाच्या जननेंद्रियाची तज्ज्ञांकडून तपासणी
ब) शुक्रजंतूची तपासणी
शुक्रजंतू दोन प्रकारे उपलब्ध होतात -
१. हस्तमैथुन करून
२. संबंध ठेवत असताना वीर्यपतन होण्यापूर्वी
क) सँपलमध्ये काय बघितले जाते?
१. शुक्रजंतूचे प्रमाण
२. त्यांचा आकार
३. त्याची चपळता
४. कुठल्याही प्रकारच्या (Infection) ची लक्षणे
ड) तपासणी आधीचे नियम
१. शुक्रजंतूची तपासणी करताना कमीत कमी २-३ दिवस आधी संबंध (वीर्यपतन) झाले नसले पाहिजे.
२. सँपल १/२ तासात लॅबमध्ये पोहचले पाहिजे.
३. शक्यतो सँपल लॅबमध्ये दिलेले बरे.
इतर चाचण्या
৭. Testicular Biopsy: शुक्रजंतूची उत्पत्ती बघतात.
२. Hormonal Tests आंतरस्त्रावाची (FSH, LH, Sr Testesterone) तपासणी
Treatment / उपाय
शुक्रजंतूचे प्रमाण कमी असल्यास कारणाप्रमाणे ट्रिटमेंटचा प्रयत्न केला जातो. हार्मोन्स / गोळ्या दिल्या जातात. Varicocele असल्यास त्याचे ऑपरेशन करावे लागते. हे सर्व करून ही जर शुक्रजंतूचे प्रमाण कमी असेल तर
१. IUI म्हणजे वीर्यातील चांगले शुक्रजंतू गाळून घेऊन त्यावर प्रक्रिया करून स्त्रीच्या गर्भाशयात नळीवाटे पोहचवता येते.
२. जर हा ही प्रयोग असफल झाला वा शुक्रजंतूचे प्रमाण खूप कमी असल्यास गर्भधारणा लॅबमध्ये घडवून तयार गर्भाचे स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. (IVF / ICSI)
IVF Test Tube baby
ह्यामध्ये एका अंडबिजा शेजारी ५० हजार शुक्रजंतू ठेवून गर्भधारणा घडविली जाते.
ICSI: Intra Cytoplasmic Sperm injection ह्यामध्ये सूक्ष्मदर्शकाखाली एक अंडबीजाबरोबर एक शुक्रजंतूचे मीलन घडवून आणले जाते.
IUI (D) वीर्यामध्ये काही कारणांनी शुक्रजंतू नसल्यास दाता-वीर्य घेऊन IUI केले जाते.
या सर्व ट्रिटमेंटमध्ये सर्वसाधारण ४०% ते ५०% यश अपेक्षित असते.
गरोदरपणी होणारा त्रास
डॉ. मिलिंद पिशवीकर
डॉ. सौ. मंजुळा पिशवीकर
गर्भवती स्त्रीने रात्रीपासून सकाळपर्यंत दहा-बारा तास उपाशी असणे ठीक नाही. तिच्या शरीरातील कॅलरीज तिला व बाळाला खर्च केल्या जातात. या काळात कॅलरीजची गरज वाढलेली असते. सकाळी उठल्याबरोबर कपभर दूध व दोन ग्लुकोज बिस्किटे खाणे आवश्यक आहे.
वैशाली तिच्या सासूबाईं बरोबर कन्सल्टिंग मध्ये आली. ती खूप थकलेली होती व बावरलेली दिसत होती. तिच्याशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की ती आणि सासूबाई यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तिचे लग्न होऊन तीन-चार महिनेच झालेले होते व पाळी चुकली होती. तिला उलट्या होत होत्या. सासूबाईंची तक्रार होती की ती व्यवस्थित खात-पीत नाही.  कायम मरगळल्यासारखी दिसते. त्या सांगत होत्या की आपल्या आवडीचे हवे ते करून खा.  तरीही काही खात नाही. त्या सांगत होत्या की मुलाचीही तक्रार असते की सुनबाई उत्साही असत नाही.
हे ऐकून मला हसू आले, कारण असे संवाद रोजच ऐकायला मिळतात. वैशालीची तपासणी केल्यावर ती दीड महिन्याची गर्भवती असल्याचे लक्षात आले. बाकी तिची प्रकृती ठीक होती. वैशालीला काही सांगण्यापेक्षा सासूबाई व पती यांना समजावून सांगणे जास्त गरजेचे होते. वैशालीला होत असलेला त्रास नैसर्गिक आहे. प्रत्येक गर्भवतीला कमी-जास्त प्रमाणात असा त्रास होतो. पहिल्या तीन महिन्यात HCG नावाचा स्त्राव गर्भवतीच्या रक्तात जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे मळमळ व उलट्या होण्याचा त्रास होतो. यापुढील काळात वार तयार होऊन लागते व उलट्या होण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. खाण्याची इच्छा होत असूनही जेवण जात नाही. यामुळे मुलींना संकोचल्यासारखे वाटते. नवीन घरातील वातावरणात समरस किंवा एकरूप झालेल्या नसतात. अशा वेळी लगेचच दिवस राहिल्यामुळे व्यवस्थित आहार न घेणे व अंतस्त्रावातील बदलांमुळे निर्माण झालेला निरुत्साह गैरसमृद्धीस कारणीभूत ठरतो. हळूहळू उत्साह वाढू लागतो व खाण्यातही फरक पडतो.
सासूबाईंच्या शंकेनुसार व्यवस्थित जेवण घेतले नाही तर गर्भावर परिणाम होण्याची शक्यता नाही का? पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे अवयव तयार होत असले तरी गर्भ लहान असल्यामुळे गर्भवतीच्या खाण्यावर अवलंबून नसते.
गरोदरपणी होणाऱ्या उलट्या व मळमळ
बाळाच्या हाडांची वाढ चौथ्या महिन्यानंतर सुरुवात होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये गर्भवतीने आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. यावेळी लक्ष न दिल्यास गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा पाणीही पचत नसले तरी गर्भाची वाढ व्यवस्थित होते.
वैशालीच्या पतीने शंका विचारली की तिचे वजन दोन किलो कमी झाले आहे व सारखी झोप येते व सतत चिडचिड करते. आजीचे म्हणणे असे की गर्भवतीने जास्त झोपणे चांगले नाही. पहिल्या तीन महिन्यात गर्भवतीचे वजन कमी होणे हा सर्वसामान्य अनुभव असतो. सारखी झोप येणे हेही स्वाभाविक असते. कारण तिच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेले असते यासाठी तिला झोपेची गरज आहे व हे समजून घेऊन तिची झोप पूर्ण होईल हे पहावे.
मलाही असे आठवते की मी गर्भवती असताना मी स्वतः अतिशय व्यस्त होते. मला ठीक वाटत नसले तरी पेशंट तपासणी करावी लागत असे. यातून केव्हा झोपायला मिळेल या संधीची वाट पाहत असे. तेव्हा या गोष्टीची काळजी करू नये. थोड्याच दिवसात तिची तब्येत बरी होईल.
वैशाली म्हणाली मला सकाळीच जास्त त्रास होतो. यावर मी विचारले दिवसभरात काय आहार घेते? त्यावर तिने सांगितले मी आंघोळ होईपर्यंत म्हणजे आठ-साडेआठ वाजेपर्यंत काहीही खात नाही. हे योग्य नाही. गर्भवती स्त्रीने रात्रीपासून सकाळपर्यंत दहा-बारा तास उपाशी असणे ठीक नाही. तिच्या शरीरातील कॅलरीज तिला व बाळाला खर्च केल्या जातात. या काळात कॅलरीजची गरज वाढलेली असते. सकाळी उठल्याबरोबर कपभर दूध व दोन ग्लुकोज बिस्किटे खाणे आवश्यक आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण (BSL) नाश्ता घेण्याच्या वेळेपर्यंत योग्य राहील. एका वेळी पूर्ण जेवण जात नाही. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाल्ले पाहिजे. नाष्ट्यानंतर पुन्हा कपभर दूध घ्यावे त्यानंतर दोन तासांनी केळ्यासारखे फळ खावे. साडेबारा ते एकच्या दरम्यान एखादी चपाती खाल्ली पाहिजे. पुन्हा एक तासाने भात खाल्ला की त्रास होणार नाही. अशा पद्धतीने दिवसभराचे जेवण विभागून घेतले पाहिजे. दर दोन तासांनी काहीतरी खाणे आवश्यक आहे. तरीही जेव्हा थकवा वाटेल त्यावेळी दोन चमचे ग्लुकोज पावडर किंवा काहीतरी चिक्की लाडू यासारखा गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल व मळमळने कमी होईल.
बऱ्याच जणी पतीबरोबर जेवणासाठी वाट पाहतात. गर्भवतींनी ही गोष्ट टाळली पाहिजे मळमळणे कमी होण्यासाठी मी वैशालीला औषध लिहून दिले. पहिले तीन महिने फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. याचबरोबर पूर्ण पोषणमूल्य मिळवण्यासाठी विटामिन च्या गोळ्या घेणे आवश्यक आहे. उलट्या होण्याचे प्रमाण वाढले तर (dehydration) शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा येतो अशा वेळी दवाखान्यात ऍडमिट होऊन सलाईन घेणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर हलके जेवण घेतले पाहिजे. मानसिक स्थिती बदलण्यासाठी वातावरण बदलणे खूप उपयोगी असते.
माझ्या एका पेशंटची गोष्ट सांगते. तिच्या सासरचे लोक तिची खूप काळजी घेत असत. तरी एक दिवसाआड तिला सलाईन द्यावे लागत असे. तिची आई येऊन तिला विश्रांतीसाठी दुसऱ्या गावी आपल्या घरी घेऊन गेली. आठवड्यातच तिची प्रकृती सुधारली. तिचे उलट्या होण्याचे प्रमाण कमी झाले. शास्त्रीय ज्ञान व माणसांचा अहं (ego) यापेक्षा निसर्ग व समंजसपणा जास्त शक्तिशाली आहे.